Dhananjay Munde | शिवस्वराज्य यात्रेत चिमुकलीची चर्चा, धनंजय मुंडेंच्या मुलीचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना लळा | ABP Majha
परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत एक चिमुकली सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. ती म्हणजे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची लेक आदीश्री. शिवस्वराज्य यात्रेदरम्यान राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांना आदीश्रीचा लळा लागला. व्यासपीठावर धनंजय मुंडे यांचं भाषण सुरु असताना खासदार अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्याजवळ ती जाऊन बसली आणि हातवारे करायला सुरुवात केली. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रेदरम्यान नेत्यांच्या भाषणासह धनंजय मुंडेंच्या लेकीची चर्चाही तितक्याच जोरदार सुरु आहे.