बीड : वीज कोसळून दाम्पत्यासह पाच जणांचा मृत्यू, 5 महिन्यांची चिमुकली बचावली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही वेळा एखादी घटना ऐकून तुम्हाला देवाचे आभारही मानावेसे वाटतात, मात्र त्याचवेळी क्रूर नियतीच्या नावानं लाखोल्याही वाहाव्याशा वाटतात. बीडमधील चारदरीच्या डोंगरावर वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. तर या मृत्यूच्या तांडवातून पाच महिन्यांची चिमुकली सुखरुप बचावली.
सोमवारी आसाराम आणि उषा आघाव हे दाम्पत्य आठ जणांसोबत शेतामध्ये ज्वारी काढण्याचं काम करत होतं. दुपारी सगळे जण जेवणासाठी झाडाखाली बसले होते. अचानक वीजेच्या गडगडाटासह पाऊस सुरु झाला. त्याचवेळी वीज कोसळून आसाराम आणि उषा यांच्यासह पाच जणांचा जागीच कोळसा झाला.