बीड : बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांच्या नोकरीवर गदा, फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार
Continues below advertisement
बीडमधील 106 बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नसताना बीड जिल्ह्यातील काही लोकांनी बोगस स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असल्याचं प्रतिज्ञापत्र देऊन विविध शासकीय विभागातील नोकऱ्या बळकावल्या होत्या. याबाबत चौकशीअंती बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना बडतर्फ करा आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य शासनानं दिले आहेत.
Continues below advertisement