स्मिथ आणि वॉर्नरची आयपीएलमधूनही हकालपट्टी!

Continues below advertisement
बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर बारा महिन्यांसाठी क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयानंतर बीसीसीआयनेही मोठी निर्णय घेतला. यंदाच्या आयपीएलमध्येही या दोघांना खेळता येणार नाही, असं आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं.

सर्व फ्रँचायझींनी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची रिप्लेसमेंट करणं गरेजचं आहे. कारण, ते दोघेही यावर्षीच्या आयपीएलमध्ये खेळणार नाहीत, अशी माहिती राजीव शुक्ला यांनी दिली.

राजस्थान रॉयल्सने यापूर्वीच स्मिथकडून कर्णधारपद काढून घेतलं आहे. त्याच्या जागी कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली. तर वॉर्नरनेही सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram