मुंबई : अँटी करप्शन युनिटच्या अहवालात मोहम्मद शमीला क्लीन चिट : सूत्र
टीम इंडियातला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर आज बीसीसीआय आपला निर्णय देऊ शकते. मागील अनेक दिवसांपासून मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहांमध्ये वादविवाद सुरु होता. हसीनने शमीवर परदेशी मित्राकडून पैशाची अवैधरित्या देवाण-घेवाण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अँटी करप्शन युनिटतर्फे याचा तपास करण्यात आला. आता तो तपास पूर्ण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अँटी करप्शनच्या अहवालात शमीला क्लीन चिट देण्यात आली आहे.