स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीमुळे धाबेमालकांमध्ये स्पर्धा, खवय्यांसाठी 'अच्छे दिन'
Continues below advertisement
राज्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे सर्वत्र लगबग सुरु आहे. प्रतिस्पर्ध्याला पाडण्यासाठी प्रत्येक उमेदवार नवनवी शक्कल लढवत आहे. कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी नवनवीन हातखंडे वापरले जात आहेत. हे हातखंडे वापरताना कधी उमेदवारांकडून जेवणाची मेजवानी किंवा इतर मार्गांचा अवलंब केला जात आहे. पण त्यामुळे धाबे चालकांमध्येही स्पर्धा रंगलेली आहे. उमेदवारांकडून जेवणावळीचं कंत्राट आपल्यालाच मिळावं, यासाठी धाबेमालक कमीत कमी दर देऊन, उमेदवारांकडून जेवणावळीचं कंत्राट मिळवत आहेत. त्यामुळे खवय्यांसाठी अच्छे दिन आले असल्याचं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
Continues below advertisement