बारामती : तुकोबांची पालखी काटेवाडीत, धोतराच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत
Continues below advertisement
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बारामतीचा मुक्काम आटोपून दुपारी काटेवाडी गावात दाखल झाला. काटेवाडीत परीट समाजाच्या वतीने धोतराच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत करण्यात आलं. बारामतीहून पालखी सोहळा मोतीबाग, बांदलवाडी, पिंपळी-लिमटेकवरून दुपारी काटेवाडी येथे आला. अनेक वर्षांपासून ही परंपरा मोठ्या उत्साहात सुरु आहे. सोहळ्याच्या स्वागतासाठी काटेवाडी येथील ग्रामस्थांनी घरोघरी रांगोळ्याही काढल्या होत्या.
Continues below advertisement