बारामती : पतीला वेळ नसल्याने व्हॉटसअॅप कॉलिंगद्वारे घटस्फोट

Continues below advertisement
कामाच्या व्यापामुळे न्यायालयात उपस्थित राहू न शकणाऱ्या पतीने चक्क व्हॉट्सॅपद्वारे पत्नीला घटस्फोट दिल्याची घटना बारामती न्यायालयात समोर आली आहे. मूळच्या बारामतीतल्या जोडप्याने संगनमताने घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानुसार कोर्टात तारीख पडली. पण पतीला नोकरीनिमित्त जर्मनीला जाण्याची घाई होती. त्यामुळे 6 महिन्याचा कूलिंग पिरेड रद्द करण्याची मागणी या दोघांनी केली. पण न्यायालयाने ती फेटाळून लावली. अखेर कुलिंग पिरेडच्या समाप्तीनंतर जानेवारीमध्ये याची सुनावणी कोर्टासमोर आली. पण या कालावधीत पती जर्मनीमध्ये होता. त्यांच्या वकिलांनी व्हिडीओ कॉलद्वारे खटल्याला उपस्थित राहण्याची परवानगी मागितली. कोर्टाने ती दिलीही. अखेर आधी स्काईप आणि मग व्हॉट्सॅप व्हिडिओ कॉलद्वारे पतीने उपस्थिती लावली. आणि अखेर घटस्फोट पार पडला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram