बारामती : संविधान बचाव रॅलीत राजू शेट्टी आणि पवारांमध्ये जवळीक वाढली
Continues below advertisement
राजकीय जीवनात बदल होत राहतात. जे योग्य वाटेल ते माणूस करत असतो, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी व्यक्त केलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वाढती जवळीक या पार्श्वभूमीवर अजीत पवार यांचं विधान महत्वाचं मानलं जात आहे. तर पुन्हा संधी नाही म्हणत अनेकजण आपल्याला व्यसन लावायचा प्रयत्न करतात. मात्र, याचं व्यसनामुळं आर. आर. पाटील यांसारखा हवाहवासा वाटणारा नेता आज आपल्यात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केलीय.
प्रजासत्ताक दिनी विरोधकांच्या संविधान बचाव रॅली राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आयोजित केली होती. या रॅलीचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार य़ांनी केलं. त्यानंतर शेट्टी आणि पवार यांच्याच जवळीक वाढत असल्याचं बोललं जात आहे. त्यावर आज अजित पवारांनी संभाव्य आघाडीबाबत सकारात्मक उत्तर दिल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय.