नवी दिल्ली : देशभरातील सरकारी बँक कर्मचारी 2 दिवस संपावर
Continues below advertisement
महिन्याच्या अखेरच्या २ दिवसात तुम्हाला बँकेत जाऊन काही महत्वाची कामं करायची असतील तर त्यामध्ये अडचण येऊ शकते. कारण आज आणि उद्या दोन दिवस देशभरातील बँक कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळं पगारी कर्मचाऱ्यांची गैरसोय होण्याची चिन्हं आहेत. तसंच या काळात ATM मशीनमध्येही पैशांचा तुटवडा भासू शकतो. पण बँकांचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सुरळीत सुरु राहणार आहेत.
इंडियन बँक असोसिएशन ने प्रस्ताव दिलेल्या 2 टक्के पगारवाढीचा निषेध म्हणून संपाची हाक देण्यात आली आहे. नऊ संघटनांचा समावेश असलेल्या 'युनायटेड युनियन फोरम ऑफ बँक युनियन' या संघटनेनं हा संप पुकारला आहे.