मुंबई : डीएसके प्रकरण, शरद पवारांपाठोपाठ राज ठाकरेंकडूनही रवींद्र मराठेंचं समर्थन

Continues below advertisement
पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्राचे रवींद्र मराठे यांच्यावरच्या कारवाईवरुन राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. रवींद्र मराठेंचा डीएसकेंच्या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, पीककर्जाचा फोलपणा रवींद्र मराठेंनी समोर ठेवल्यानं मुख्यमंत्र्यांनीच त्यांच्यावर आकसापोटी कारवाई करायला लावली, असा दावा राज ठाकरेंनी केला आहे. शिवाय बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोद्यात विलीनीकरणाचा डावा असल्याचा गंभीर आरोपही राज यांनी केला.  तर तिकडे पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनीही रवींद्र मराठे यांचं समर्थन करुन त्यांच्यावर झालेली अटकेची कारवाई चुकीचं असल्याचं म्हटलं.  डीएसकेंनी थकवलेल्या गुंतवणूकदारांच्या प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे अटकेत आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram