VIDEO | सीआरपीएफच्या जवानांवर पुन्हा हल्ला, ताफ्याजवळ कारमध्ये स्फोट | श्रीनगर | एबीपी माझा
जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) जवानांच्या ताफ्याजवळ आज (शनिवारी) एका कारमध्ये स्फोट झाला आहे. बनिहाल येथे श्रीनगर-जम्मू महामार्गावरुन सीआरपीएफचा ताफा जात होता. त्यावेळी या ताफ्याजवळच एका कारमध्ये स्फोट झाला. गाडीमध्ये असलेल्या सिलिंडरचा स्फोट घडवून आणला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या कारचा चालक बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे.