ढाका : बांगलादेशने सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण हटवलं!
Continues below advertisement
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण हटवणार असल्याचं जाहीर केलं. विशेष गटांसाठी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण योजनेविरोधात हजारो विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. शेख हसीनांचा हा निर्णय त्यांच्या आंदोलनाचा विजय मानला जात आहे. सार्वजनिक विभागातील जागांमध्ये 56 टक्के आरक्षण नोकऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची मुलं, महिला, पारंपारिक अल्पसंख्यांक, अपंग आणि मागासलेल्या जिल्ह्यांमधील लोकांसाठी होतं. ती हटवण्याची आंदोलनकांची मागणी होती. अखेर आंदोलनकांची मागणी मान्य करत शेख हसीना यांनी बांगलादेशच्या संसदेत आरक्षण हटवण्याची घोषणा केली.
Continues below advertisement