मुंबई : वांद्रे परिसरात दोन मुलांसह दाम्पत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट

Continues below advertisement

एकाच कुंटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील वांद्रे भागात घडली आहे. वांद्र्यातील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या पती-पत्नीने 2 मुलांसह आपले जीवन संपवलं आहे.

राजेश भिंगारे नावाच्या व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली. राजेश भिंगारे हे मंत्रालयात शिधावाटप खात्यात काम करत होते. हे कुटुंब शासकीय वसाहतीच्या इमारत क्रमांक दोनमध्ये राहात असल्याची माहिती आहे.

एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसंच या आत्महत्यामागे नेमकं काय कारण आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram