कोल्हापूर: कुस्ती खेळताना पैलवान गंभीर जखमी

Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातल्या बांदिवडे गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती सामन्यात एक पैलवान गंभीर जखमी झाला... निलेश कंदूरकर असं त्या जखमी पैलवानाचं नाव आहे.. जोतिबा यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती मैदानात ही दुर्घटना घडली...निलेश कुस्ती खेळण्यासाठी मैदानात उतरला.. प्रतिस्पर्ध्यानं निलेशला आपल्या कवेत धरलं आणि मग उचलून खाली जमिनीवर आपटलं... त्यावेळी निलेश जमिनीवर निपचित पडला आणि त्याच्या मानेच्या शिरेला दुखापत झाली...त्यानंतर उपचारासाठी त्याला कोल्हापुरातल्या  खाजगी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं, मात्र तिथं उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही... त्यामुळे पुढील उपचारासाठी मुंबईला आणत असताना वाटेतच त्याची प्रकृती बिघडली. सध्या निलेशवर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram