वाराणसी : हिंदू विद्यापीठात छेड काढल्यानं विद्यार्थिनींचं आंदोलन, पोलिसांचा लाठीमार
Continues below advertisement
बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींनी छेडलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. तीन दिवसांपूर्वी विद्यापीठात एका विद्यार्थिनीसोबत छेडछाड झाली. याच्या निषेधार्थ विद्यार्थिनींनी हे आंदोलन छेडलं. काल कुलगुरुंना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी या विद्यार्थीनी पोहोचल्या. परंतु तिथं विद्यार्थिनींवर लाठीमार करण्यात आला. विद्यापीठाच्या मेन गेटबाहेर आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींवरही पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीहल्ल्यात अनेक विद्यार्थिनी जखमी झाल्या असून त्यातील एक जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
Continues below advertisement