चंद्रपूर : रेल्वे स्टेशन सौंदर्यीकरण स्पर्धेत महाराष्ट्राची बाजी
Continues below advertisement
रेल्वे स्टेशनच्या सौंदर्यीकरण स्पर्धेत महाराष्ट्राने बाजी मारली आहे. चंद्रपूर आणि बल्लारशाह या दोन स्थानकांना पहिलं पारितोषिक विभागून देण्यात आलं आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दोन स्थानकांवर विदर्भातील प्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि स्थानिक आदिवासी कलेच्या आधारे पेंटिग्ज, मूर्तींच्या कलाकृती तसंच भित्तीचित्रांचा वापर करत सौंदर्यीकरण केले आहे.
या स्पर्धेत बिहारमधील मधुबनी स्थानकाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर तामिळनाडूमधील मदुराई स्थानकानेही दुसरं स्थान पटकवलं आहे.