Balbharati Maths | बालभारतीच्या दुसरीच्या पुस्तकात बदल, 32 ऐवजी 30 आणि 2 असा उल्लेख | ABP Majha

बालभारतीच्या दुसरी इयत्तेतील गणिताच्या पुस्तकात नवे बदल करण्यात आलेत. 21 ते 99 हे आकडे आता यापुढे जोडाक्षराप्रमाणे नाही तर संख्यावाचनाप्रमाणे शिक्षकांनी शिकवायचे आहेत. म्हणजेच 32 या आकड्याचा थेट बत्तीस असा उल्लेख न करता तीस आणि 2 असा उल्लेख करायचा. जोडाक्षरामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम होत असून गणिताची नावड निर्माण होत असल्याचं बालभारतीचं म्हणणं आहे. शिवाय इंग्रजीसोबतच कानडी, तेलगू, तामिळ भाषांमध्येही अशाच प्रमाणे शिक्षण होत असल्याचं बालभारतीनं सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram