बजाज इलेक्ट्रिकल्स मराठमोळ्या निर्लेप कंपनीची खरेदी करणार!
स्वयंपाक घरातील नॉनस्टिक तव्यापासून कढईपर्यंत सगळी भांडी आणि वस्तू बनवणारी निर्लेप ही कंपनी आता बजाज इलेक्ट्रिकल्स विकत घेणार आहे. विशेष म्हणजे यंदा या कंपनीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सुवर्णमहोत्सवी वर्षातच निर्लेप या मराठमोळ्या कंपनीची विक्री होणार आहे.