भारतीय महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाबरोबर गैरवर्तन?
बॉलिवूड आणि राजकारण्यांपाठोपाठ आता क्रीडा क्षेत्रातही मीटूचं वादळ घुमू लागलंय..कारण भारतीय महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यांनी देखील आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याचं ट्विटरद्वारे व्यक्त केलंय. बॅडमिंटन संघटनातील एका पदाधिकाऱ्यांवर त्यांनी गैरवर्तनाचे आरोप केलेत. त्या व्यक्तीमुळे आपली कारकीर्दच संपली असं ट्विट करत त्यांनी हे आरोप केलेत.