बदलापूर: वाहनचालकांचा सत्कार करत झंडू बाम भेट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बदलापूरहून-पनवेलला जाणाऱ्या मार्गावर प्रचंड खड्डे पडले असून याकडे एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष होतंय. याचा शिवसेनेनं आज अनोख्या पद्धतीनं निषेध केला. या रस्त्यावरून वाहनं चालवणाऱ्या वाहनचालकांचा शिवसेनेनं चक्क शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना शारीरिक त्रास सुरू असून त्यावर इलाज म्हणून झंडू बामच्या बाटल्याही शिवसेनेनं वाटल्या.