ठाणे : बदलापुरात एमडी ड्रग्चचा मोठा साठा जप्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ठाणे : बदलापुरात एमडी ड्रग्जचा मोठा साठा मुंबई पोलिसांनी जप्त केलाय... आंबोली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली... काही दिवसांपूर्वी एमडी ड्रग्ज विकताना शाहिद शहा नामक एका ड्रग पेडलरला अटक करण्यात आली होती... या ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीवरुनच बदलापूर एमआयडीसीतल्या शारदा केमिकल्स या कंपनीवर छापा टाकण्यात आला... आणि तब्बल साडेसात कोटी रुपयांचा साठा जप्त केला... या कंपनीला सील ठोकण्यात आलं असून कंपनीचा मालक नारायणभाई पटेल यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात...