बदलापूर : तीन एकर जागेसाठी खडसेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं : बच्चू कडू

बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधलाय. 3 एकर जागेसाठी एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं आणि दुसरीकडे नारायण राणेंना राज्यसभेवर पाठवलं असा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावलाय. बदलापूरच्या कार्यकर्ता मेळाव्यात बच्चू कडू बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुनही  त्यांनी भाजप सरकारवर घणाघाती टीका केली. सरकार पोकळ आश्वासन देऊन शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडत आहे असंही बच्चू कडू म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola