बदलापूर : मालगाडीचं इंजिन बिघडल्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम
मध्य रेल्वेच्या बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकादरम्यान मालगाडी बंद पडल्यानं बदलापूरहून सीएसएमटीकडे येणारी वाहतूक कोलमडली आहे. प्रवाशांचे यामुळे हाल होत आहेत. बदलापूर आणि अंबरनाथदरम्यान मालगाडीच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाला आहे. परिणामी बदलापूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. या इंजिनाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.