पुणे : निर्मला गोगटे आणि बाबा पार्सेकरांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर
Continues below advertisement
ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे आणि ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी याबाबतची घोषणा केली.
राज्य शासनामार्फत देण्यात येणारा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांना, तर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी याबाबतची घोषणा केली.
Continues below advertisement