लढाऊ विमान चालवणारी अवनी चतुर्वेदी पहिली महिला वैमानिक

ही बातमी आहे आपल्या सर्वांनाच अभिमानाने मान उंच करायला लावणारी...  इंडियन एअरफोर्सची फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने नवा इतिहास रचलाय.
कारण फायटर प्लेन चालवणारी ती देशातली पहिली महिला वैमानिक आहे.
अवनीने गुजरातच्या जामनगर मधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलंय. आणि 18 तारखेला अवनीने मिग 21 या फायटर प्लेनसह आकाशात झेप घेतली.
याआधी महिला फायटर प्लेन चालवायच्या मात्र त्यावेळी त्यांच्या मदतीला पुरूष कर्मचारीही असायचे मात्र अवनीने एकटीने हे विमान चालवल्याने तिने नवा इतिहास रचलाय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola