औरंगाबाद पालिकेत मालमत्ता कर वसुलीच्या खासगीकरणावरुन गोंधळ
Continues below advertisement
औरंगाबाद महापालिकेत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार राडा पाहायला मिळाला. एमआयएम आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ घालत राजदंड पळावला. महापौर भगवान घडामोडे यांनी सर्व साधारण सभेती परवानगी न घेता मालमत्ताकर वसूलीच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. मालमत्ता कर वसूलीच्या खासगीकरणाला शिवसेना आणि एमआयएमचा विरोध होता. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी एमआयएम आणि शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर उभे राहिले आणि राजदंड पळवला. मात्र महापौरांनी चतुराईने स्वत:च राष्ट्रगीताला सुरुवात केली आणि वादग्रस्त प्रस्ताव मंजूर करून घेतला.
Continues below advertisement