औरंगाबाद : नाल्यात पडून बाईकस्वार वाहून गेला
औरंगाबाद शहरात नाल्यात पडून आणखी एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. चेतन चोपडे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते 38 वर्षांचे होते. चेतन आपली बुलेट गाडी घेऊन एन 6 या भागातून जात होते. मात्र त्यांचं गाडीवरच नियंत्रण सुटलं, आणि ते उघड्या नाल्यात पडले. पावसामुळे नाल्याला पाणी आल्याने ते वाहून गेले. नाल्यात पडून मृत्यू होण्याची औरंगाबाद शहरातली ही दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे याच नाल्यात दोन वर्षांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतरही मनपाने इथे संरक्षक जाळी बसवली नाही. नाल्यात पडून मृत्यूच्या या घटनांमुळे मनपाच्या कारभारावर प्रश्नचिन्हं निर्माण होतं आहे.