औरंगाबाद: पॅसेंजर गाडीत महिलेला बेदम मारहाण

Continues below advertisement
औरंगाबादकडून हैद्राबादकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाडीत एका महिलेला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. 21 मार्च रोजी गाडी औरंगाबाद जवळच्या सेलू रेल्वे स्थानकात आली. त्यानंतर बसण्याच्या जागेवरुन एक कुटुंब आणि तीन तरुणांमध्ये वादावादीला सुरुवात झाली. या वादातूनच एका तरुणाने कुटुंबातील महिलेला खाली पाडून लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केली. हा संपुर्ण प्रकार भरगच्च भरलेल्या बोगीत सुरु होता. परंतु कोणीही त्या तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. तो तरुण महिलेला तब्बल पंधरा मिनिटे मारहाण करत होता.  दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर औरंगाबाद येथील रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram