औरंगाबाद: आमदार प्रशांत बंब यांच्या दादागिरीचा व्हिडीओ व्हायरल
Continues below advertisement
औरंगाबाद जिल्ह्यतल्या गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी
आपल्या कार्यकर्त्याची गुटख्याची गाडी सोडली नाही म्हणून पोलिसांना दमबाजी केली आहे...या दादागिरीचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एवढंच काय, मुख्यमंत्र्यांशी माझं चांगलं आहे, मी तुमची बदली करायला सांगेन अशीही धमकी त्यांनी दिली आहे. गंगापूर पोलिसांनी एक गुटख्याची गाडी पकडली होती, ही गाडी बंब यांच्या कार्यकर्त्याची होती. आमदार बंब यांनी पोलिसांना फोन करुन ही गाडी सोडायला सांगितलं. मात्र पोलिसांनी तरीही गाडीवर कारवाई केली. यामुळं बंब यांनी थेट गंगापूर पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना दमबाजी केली. दरम्यान हा व्हीडिओ कधीचा आहे? याची माहिती नाही. शिवाय आम्ही बंब यांच्याशीही संपर्क करायचा प्रयत्न करतोय, पण त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाहीए.