औरंगाबाद : पेट्रोल पंपावर पाणीमिश्रीत पेट्रोल-डिझेल, ग्राहकांचा संताप
औरंगाबादमध्ये भारत पेट्रोलियम कंपनीच्या एका पेट्रोलपंपावर चक्क पाणीमिश्रीत पेट्रोल-डिझेल मिळत असल्याचं समोर आलंय. उस्मानपुरा गोपाळ टी परिसरात हा पेट्रोलपंप आहे. इथं येणाऱ्या ग्राहकांना ग्राहकांना एका लिटरमागे साधारण शंभर मिली पाणी मिळत होतं. सुरुवातीला ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही, मात्र सुस्थितीत असलेल्या कार आणि दुचाकी अचानक बंद पडू लागल्या. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं. अखेर पेट्रोल-डिझेल पाणीमिश्रीत असल्याचं कळल्यानंतर संतप्त ग्राहकांनी आपला मोर्चा थेट पंपावर वळवला.