औरंगाबाद : व्हिडीओकॉन कंपनीमधील कर्मचारी 12 दिवस सक्तीच्या रजेवर

Continues below advertisement
औरंगाबादमधील व्हिडिओकॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांना १२ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. इथले हजारो कर्मचारी 8 जानेवारीपासून सक्तीच्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. औरंगाबादमध्ये व्हिडिओकॉनचं मोठं युनिट आहे. यात फ्रीज, वॉशिंग मशिन, मोबाईल, एसी आणि इतर घरगुती उपकरणांची निर्मिती केली जाते.
दरम्यान औरंगाबादमधील कंपनीच्या युनिटमध्ये 6 हजार 459 कर्मचारी कार्यरत आहेत. व्हिडीओकॉनकडे तब्बल 45 हजार कोटी बँकेचे थकित असल्यातं समजतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram