औरंगाबाद | भाव मिळत नसल्याने टॉमेटो फेकण्याची वेळ, रस्त्यावर लाल डोंगर
मोठ्या कष्टाने पिकवलेल्या लालबुंद टोमॅटोला भाव मिळत नसल्याने लाखो क्विंटल टोमॅटो रस्त्यावर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा, गाजगाव, सिल्लेगाव, सावंगी, माळी वडगाव, धामोरी या शिवारात टोमॅटोचा लाल चिखल नाही तर टाकून दिलेल्या टोमॅटोचे डोंगर उभे राहिलेत. हा सगळा टोमॅटो शेतकऱ्यांनी उत्पादन खर्चही हाती लागत नसल्याने आणि बाजारात घेऊन जाण्याचा भावही मिळत नसल्याने टाकून दिलेला आहे.