
औरंगाबाद : समुपदेशनानंतर अखेर 'त्या' मुलीला थिटे दाम्पत्याने स्वीकारलं
Continues below advertisement
बीड जिल्ह्यातल्या वडवणी गावातल्या थिटे दाम्पत्यानं नकोशा केलेल्या नवजात मुलीला स्वीकारलं आहे... बीड जिल्हा रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलीला थिटे दाम्पत्यानं आधी स्वीकारण्यास नकार दिला होता.. प्रशासनाकडून थिटे दाम्पत्याला मुलगा झाल्याचं आधी सांगण्यात आलं, पण नंतर चूक दुरुस्त करुन प्रशासनानं थिटे दाम्पत्याला मुलगी झाल्याचं सांगताच त्यांनी मुलीला स्वीकारण्यास नकार दिला... मात्र डीएनए चाचणी केल्यानंतर ही मुलगी थिटे दाम्पत्याची असल्याचं निष्पन्न झालं... अखेर भारतीय समाजसेवा केंद्राच्या अध्यक्षा ज्योती पत्की यांनी थिटे दाम्पत्याचं समुपदेशन केलं... त्यानंतर थिटे दाम्पत्यानं आपल्या तान्हुलीला स्वीकारलंय... त्यामुळे तब्बल 24 दिवसांनी तान्हुली आपल्या मायेची ऊब अनुभवणार आहे...
Continues below advertisement