औरंगाबाद : सीरियातील हिंसाचाराचा निषेध, मुस्लिम समाजाचा मोर्चा
Continues below advertisement
सीरीयामध्ये होणाऱ्या हिंसाचाराचा निषेध कऱण्यासाठी औरंगाबादेत मुस्लिम समाजानं निषेध मोर्चा काढला. हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी या मोर्चाला हजेरी लावली. भारत सरकारनं लक्ष घालावं आणि शांतेतेच्या मार्गानं प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चाला स्वामी अग्निवेश यांनीही हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. काही लोक देशाला डुबवून पळून जातात आणि पंतप्रधान फक्त तमाशा बघतायत अशी टिका त्यांनी यावेळी केली
Continues below advertisement