औरंगाबाद | अच्छे दिन आले, अंधारात व्हिडीओ शूट करत सुप्रियांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ऑक्टोबर हीटचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील जनतेला आता भारनियमनाला सामोरं जावं लागत आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यभरात भारनियमन सुरु झालं आहे. त्यामुळे सरकारवर विरोधकांकडून टीकास्त्र सोडण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट अंधारात व्हिडीओ शूट करुन फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.