औरंगाबाद : चालत्या गाडीत बसचालक मोबाईलवर गुंग, व्हिडीओ व्हायरल
एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षेची हमी देतं. मात्र, याच महामंडळाचा चालक बस चालवताना मोबाईलफोनवर व्हॉट्सअॅप हाताळतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैठण जालना बसमध्ये हा प्रकार घडला आहे. बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. मात्र, चालत्या बसमध्ये चालकाला मोबाईलवर व्हॉट्सअप आणि फेसबूक पाहण्याचा मोह आवरता आला नाही.