औरंगाबाद : शिवसेनेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली
Continues below advertisement
औरंगाबाद हिंसाचारानंतर पोलिसांनी केलेल्या धरपकडीच्या विरोधात शिवसेनेनं मोर्चा काढलाय. औरंगाबाद शहरातील पैठण गेट येथून विभागीय आयुक्तालयावर हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील दंगलीनंतर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर धरपकड करण्यात आल्याचा आरोप सेनेतर्फे करण्यात आला आहे..पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र तरीही हा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान सनेच्या या मोर्चात शहरातील अनेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या आहेत
Continues below advertisement