औरंगाबादेत भाऊबीजेसोबत सगरही उत्साहात साजरा | औरंगाबाद | एबीपी माझा

औरंगाबादेत भाऊबीजेसोबतच सगर हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गवळी बांधवांनी आकर्षक पद्धतीने सजवलेले म्हशी आणि रेडे हे या उत्सवाचं मोठं आकर्षण होतं. यावेळी रेड्यांच्या कसरती आणि नाचही सादर केला गेला. औरंगाबादेत सगर सणाची तब्बल दीडशे वर्षाची परंपरा आहे. शक्तीची पूजा म्हणून रेड्याची पूजा करण्यात येते. तसंच नव्या वर्षात कुठलंही संकट येऊ नये म्हणून रेड्याची पूजा करुन यमराजाला खूश करण्याचा प्रयत्न केला जातो, अशी या प्रथेमागे अख्यायिका सांगितली जाते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola