औरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर

Continues below advertisement
औरंगाबाद : औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. रात्री दोनच्या सुमारास ही मारहाण करण्यात आली.

या घटनेनंतर घाटी रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

निवासी डॉक्टर डॉ. हर्षद चव्हाण यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली. तसचं एका सहयोगी प्राध्यापकालाही धक्काबुकी करण्यात आली.

रुग्णाजवळ अधिक लोक थांबू नका. असं सांगितल्याने डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला. याच वादातून रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याचं समजतं आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता प्रशासन मारहाण करणाऱ्या नातेवाईंकांवर नेमकी काय कारवाई करणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram