औरंगाबाद : कचराकोंडीमुळे नव संकट, एका दिवसात भटक्या कुत्र्यांच्या हल्लात 30 जण जखमी
Continues below advertisement
औरंगाबादेत कचराकोंडींच संकट असताना आता आणखी एक नवं संकट उभं राहिलं. कारण ठिकठिकाणी साचलेल्या कचराकोंडीमुळे आता शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. एन नाईन परिसरात एका कुत्र्याने तब्बल 25 ते 30 जणांना चावा घेतल्यानं खळबळ उडाली आहे. यामध्ये 9 लहान मुलांचाही समावेश आहे. यामध्ये 17 जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु आहेत. औरंबादेतील कचराकोंडीला आता महिना उलटला आहे. त्यामुळे चौकाचौकात, गल्लाबोळात आणि रस्त्यांवर कचरा दिसू लागला आहे. परिणामी शहराच्या आजबाजुच्या परिसरातून कुत्र्यांनी या कचऱ्याकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे आता ही कचराकोंडी औरंबादकरांच्या जीवावर उठली असं म्हणनं वावगं ठरणार नाही.
Continues below advertisement