औरंगाबाद : प्राध्यापक मनिषा वाघामारेंकडून एव्हरेस्ट मोहीम फत्ते!
Continues below advertisement
औरंगाबादच्या मनीषा वाघमारे यांनी एव्हरेस्ट शिखर यशस्वीरीत्या सर केलं आहे. आज सकाळी आठ वाजता मनिषा यांनी एव्हरेस्ट सर केल्याची माहिती मिळत आहे. मनिषा यांनी 2017 मध्ये सुद्धा एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रकृती ठणठणीत असतानाही शिखरमाथा अवघा 170 मिटरवर राहिला असताना मनिषा यांना माघारी फिरावं लागलं होतं. मात्र जरासुद्धा न खचता मनिषा यांनी पुन्हा एव्हरेस्ट सर करण्याची मोहीम आखली आणि आज सकाळी 8 वाजता त्यांनी आपलं स्वप्न सत्त्यात उतरवलं. मनिषा वाघमारे या पेशाने प्राध्यापिका आहेत.
Continues below advertisement