औरंगाबाद: महाजन कुटुंबाचा जमिनीचा वाद कोर्टाबाहेर मिटला
उस्मानाबादेतील जमिनीचा वाद महाजन कुटुंबांनी कोर्टाबाहेर मिटवलाय आहे. अशी माहिती प्रकाश महाजन यांनी दिलीय. महाजन कुटुंबीयांची उस्मानाबादेत वडिलोपार्जित संपत्ती आहे ,त्या संपत्तीवरून प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला होता. या जमिनीच्या वादावरून सारंगी महाजन यांनी महाजन कुटुंबावर आरोप केले होते. मात्र हा वाद मिटल्याची माहिती प्रकाश महाजन यांनी दिली. सारंगी महाजन यांना हवा असलेला वाटा त्यांना दिला आणि त्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये दाखल केलेला दावा देखील मागे घेतल्याची प्रकाश महाजन यांनी म्हटलंय.