औरंगाबाद: 8 लाखाचं विज बिल पाहून आत्महत्या

Continues below advertisement
महावितरणच्या अजब कारभाराचा अनुभव आपल्याला अनेकदा आला असेल. मात्र, महावितरणने पाठवलेल्या बिलामुळे एकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत घडलाय. महावितरणकडून तब्बल ८ लाख रुपयाचं बील पाठवण्यात आलं. त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी अंगावर चिकटवून जगन्नाथ शेळके यांनी गळफास घेतला.
या बातमीनंतर ज्या लिपीकानं हे वीज बिल टाईप केलंय. त्या सुशील कोळी कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांनी नकार दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram