औरंगाबाद : बियर वाहून नेणारा ट्रक उलटला, ड्रायव्हर जखमी, लोकांनी बियरचे बॉक्स पळवले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबाद-बीड महामार्गावर बीअर वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झालाय. यात ड्रायव्हर आणि क्लीनर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आज सकाळच्या सुमारास पिंपळगावनजीक ही घटना घडली. मात्र या भीषण अपघातानंतर लोकांनी बियरचे बॉक्स पळवले. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय.
दरम्यान हा ट्रक कुठल्या कंपनीचा होता, तो कुठे जात होता? याचा तपशील अद्याप हाती आलेला नाही.