पैठण, औरंगाबाद : खर्च वसूल न झाल्याने 30 क्विंटल कांदा फुकट वाटला
Continues below advertisement
राज्यातल्या कांदा उत्पादकांची अवस्था काय आहे, हे दाखवणारी दृश्ये 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहेत. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातल्या पोरगाव तांड्यात राजपाल सिंह यांनी आपल्या शेतातले 30 क्विंटल कांदे योग्य दर मिळत नसल्यानं फुकटात वाटून टाकले. राजपाल सिंह यांनी आपल्या पाच एकरात कांद्याची लागवड केली होती. त्यातून मिळालेले 30 क्विंटल कांदे घेऊन ते औरंगाबादच्या बाजार समितीत आले. पण बाजारात या कांद्याला अवघा 2 रुपये किलो असा भाव समोर आला. त्यामुळे व्यथित झालेल्या राजपाल सिंह यांनी आज हाच कांदा गोरगरिबांना फुकट वाटला.
Continues below advertisement