औरंगाबाद : शहरात कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधी, राजकारण्यांच्या घरासमोर मात्र स्वच्छता
Continues below advertisement
आज सलग 14 व्या दिवशीही औरंगाबादच्या कचराकोंडीवर तोडगा काढण्यात अपयश आलं आहे. आज दिवसभर प्रशासनाने कचरा डेपोच्या शेजारी असलेल्या नरेगावशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. पण गावकरी कचराबंदीवर ठाम राहिल्यानं पोलिसांच्या सुरक्षेमध्ये कचऱ्याच्या काही गाड्या रिकाम्या करण्यात आल्या. दुसरीकडे शहरातला कचरा टाकण्यासाठी जागा शोधणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱयांना अनेक गावकऱ्यांनी हुसकवून लावलं. कांचनवाडी, हनुमान टेकडी आणि पडेगाव... या प्रत्येक गावातून ग्रामस्थांनी कचऱ्याच्या गाड्या परतवून लावल्या. यावेळी कांचनवाडी परिसरामध्ये आंदोलकांनी दगडफेकही केली.
एकीकडे औरंगाबाद शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग पडलेले असताना राज्यकर्त्यांच्या घराबाहेरच्या परिसरात मात्र उत्तम स्वच्छता राखलेली दिसते.
शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे, भाजपचे आमदार अतुल सावे आणि एम आय एमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर मात्र जराही कचरा आढळलेला दिसत नाही.