महाराष्ट्रात उष्णतेची लाट, अचानक तापमानाचा पारा वाढल्याने अबालवृद्धांना त्रास
Continues below advertisement
गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात जणू उष्णतेची लाट आलीय की काय अशी स्थिती आहे. कारण सकाळी नऊ वाजेपासूनच पारा चढण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे वृद्ध, लहान मुलं आणि कामासाठी दिवसभर उन्हातान्हात फिरणाऱ्यांच्या जीवाची अक्षरश: काहिली होते आहे. अचानक वाढलेल्या उन्हामुळे डिहायड्रेशन होणं, चक्कर येणं आणि त्वचेचे विकार होण्याची भीती आहे.
त्यामुळे उन्हात बाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलं. दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे थंड पेयांची विक्री करणारे आणि इतर वस्तू विकणाऱ्यांची मात्र चांदी झाली. कारण एरवी चहाच्या गाड्यावरची गर्दी आता उसाच्या रसाच्या गाड्यावर किंवा ताक, लस्सीच्या ठेल्यांवर पाहायला मिळतेय.