औरंगाबाद : शहरात कचऱ्याचं साम्राज्य, खा. खैरेंच्या घराबाहेर चकाचक
Continues below advertisement
औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेची महापालिकेत सत्ता असलेल्या औरंगाबाद शहरात सध्या नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालं आहे. कारण, गेल्या 13 दिवसांपासून शहरातून कचरा उचलला गेलेला नाही. सलग 13 दिवसांपासून कचराकोंडी कायम आहे.
औरंगाबादपासून 15 किलोमीटरवर असलेल्या नारेगावच्या कचरा डेपोत सध्या कचरा टाकला जातो. मात्र, तिथल्या ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केल्याने मोठा पेच निर्माण झालाय. कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नसल्याने आणि त्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्याने रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.