औरंगाबाद : वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, MIM नगरसेवकाला बेदम चोप
Continues below advertisement
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणारे एमआयएमच्या नगरसेवकाला भाजप नगरसेवकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार औरंगाबाद महापालिकेत घडला. भाजप नगरसेवकांनी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना चोप दिला. शिवसेनचे राजू वैद्य यांनी 'भारतरत्न' अटलजींचा श्रद्धांजली प्रस्ताव मांडला. मात्र सय्यद मतीन यांनी या प्रस्तावाला विरोध केला. यानंतर संतापलेले नगरसेवक प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे हे मतीन यांच्यावर धावून गेले. यापुढे जाऊन त्यांनी मतीन यांना बेदम मारहाण करुन सभागृहाबाहेर बाहेर काढलं. तसंच सय्यद मतीनला कायमस्वरुपी निलंबित करावं, अशी मागणीही या नगरसेवकांनी केली आहे
Continues below advertisement